top of page

ग्रामगौरव प्रकाशनाविषयी :

'प्रतिबिंब महाराष्ट्राचं,ग्रामीण विकासाचं!' या टॅगलाईनवर राज्यातील गावगाड्याचा - शेती मातीचा फक्त आणि फक्त सकारात्मक प्रवास उलगडणारे NO NEGATIVE हा अजेंडा प्रमाण मानून समाजातील जे चांगले आहे त्याचाच प्रचार प्रसार करण्यासाठी आमच्या 'ग्रामगौरव' प्रकाशन पुण्यातून कार्यरत आहे.

महानगरं आणि शहरे झपाट्याने बदलत असताना गावखेड्यांना विकासमार्गात अनेक अडथळे येतात.आजही शहरं म्हणजे 'इंडिया' आणि गावं म्हणजे 'भारत' असा फरक प्रकर्षाने जाणवतो.

ग्रामविकासात ग्रामसभेला अमर्याद अधिकार असताना त्याचे महत्व या सभांच्या कोरमला अद्याप सुद्धा समजला नाही,हे दुर्दैव आहे.तथापि,दुसरीकडे मात्र ग्रामीण भागातून आरोग्य,महिला बालकल्याण,कृषी,पशुपालन व दुग्धक्रांती,स्मार्ट नियोजनातून शाळांत प्रयोगशील उपक्रम, विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास, अधिकारी - कर्मचाऱ्यांची लोकाभिमुख सेवापद्धती,आदर्श गाव योजनेतून प्रेरणा घेवून अनेक गावांनी मूलभूत सुविधांच्या पुढे जावून मोठी भौतिक प्रगती साधली असून असे अनेक ठिकाणी दिलासा देणारे व प्रगतीचे आश्वासक चित्र सुद्धा दिसते.विशेष म्हणजे अनेक आदिवासी भागातील डोंगरदऱ्या आणि कान्याकोपऱ्यात असलेल्या गावांनी लोकसहभागातून विकासाची व हेवा वाटणारी आदर्शवत कामे उभी केली आहेत.

महिला बचत गट,फार्मर प्रोडयुसर कंपन्या,शेतकरी समूह गट,ग्रामीण भागातून अनेक छोटे उद्योजक,मोठी उत्पादने देणाऱ्या कॉर्पोरेट कंपन्या,प्रतिकूल परिस्थितीवर मात करत अधिकारी होणारे युवक, आधिच शेती-मातीशी नाते असलेल्या अधिकाऱ्यांनी सामान्यांची निकड ओळखून प्रशासनात उभारलेला पारदर्शी कारभार यामुळे सुद्धा ग्रामीण महाराष्ट्र नवीन उभारी साधत आहे.

ग्रामगौरव प्रकाशन अशाच सर्व सकारात्मक वाटचाली हेरून 'लोकल टु ग्लोबल' काम उभे केलेल्यांची दखल व्हावी,एका ठिकाणच्या चांगल्या कामाची प्रेरणा घेवून दुसऱ्या ठिकाणी सुद्धा असे काम उभे राहावे यासाठी फक्त विकासाच्या गुजगोष्टी सांगणारे सकारात्मक पत्रकारितेचा नवा पायंडा घेवून काम करणारे प्रकाशन म्हणून प्रारंभ झाले आहे.

• प्रिंट आणि ई - मासिक :
आमच्या मिडिया हाऊसचे दरमहा
ग्रामीण विकासाला पूरक सोप्या भाषेतील विविध विषयांच्या गुणवत्तापूर्ण मजकुराचे,आकर्षक मांडणी आणि प्रभावी छपाई असलेले मासिक राज्यभर दमदार वाटचाल करीत आहे.मासिकाचा विषयहेतू आणि मांडणीची पद्धती पाहून अल्पावधीत मासिक लोकप्रिय ठरत असून सर्वस्तरातून स्वागत होत आहे.मासिक सद्या वेबसाईटवर डिजिटल स्वरूपात उपलब्ध असून मराठीतील याच मासिकाची इंग्लिश व हिंदी भाषेत सुध्दा ई-आवृत्ती लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

• ग्रामTV & पॉडकास्ट :
आमच्या प्रकाशनाचे 'ग्रामटिव्ही' हे सेटेलाईट चॅनल आणि पॉडकास्ट हे रेडिओ स्वरुपातील नवीन माध्यम आम्ही सुरू केले
असून यात सुद्धा विकासाचा व प्रगतीचा राजमार्ग स्वीकारलेल्या व्यक्ती, संस्था,शासकीय यंत्रणा,समूह, संघटना अशा विविध घटकांना प्रभावीरीत्या पण फक्त पॉझिटीव्ह पद्धतीने लोकांसमोर आम्ही मांडत असतो.

• ऑनलाईन पोर्टल :
पंचायतराज आणि ग्रामविकासाच्या त्रीस्तरीय पद्धतीत ग्रामपंचायत,पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदा या संस्थांच्या बळकटीसाठी शासनाने राबलेले उपक्रम,ग्रामीण भागातील जीवनाला उत्थान देण्यासाठी कार्यरत ग्रामविकास,पाणीपुरवठा व स्वच्छता,महसूल,कृषी,ग्रामीण आरोग्य,पशुसंवर्धन -दुग्धविकास, महिला-बालकल्याण अशा विभागांच्या शासकीय निर्णय,योजना आणि वाटचालीच्या लोकांना हिताच्या ठरणाऱ्या सकारात्मक बातम्या,कार्यक्रम,घटना - घडामोडी आमच्या ऑनलाईन पोर्टलवर उपलब्ध राहतील.

संपादकीय हेड  :
+91 96572 40824
--------------------------------------------------

वितरण युनिट :
+91 84218 40157
--------------------------------------------------

जाहिरात & व्यवस्थापन :
+91 99756 70612
--------------------------------------------------

रजिस्टर्ड ऑफिस : 
श्री साई मल्टी सर्विसेस, एफ-१, तिसरा मजला, गोलाणी मार्केट, जळगांव - ४२५००१
कार्पोरेट ऑफिस : 
‘लोकमान्य हाऊस’ ७,८,९, पहिला मजला, लुईस फिलिप शोरुमच्या वर, साई सयाजी सीएनजी पंपाजवळ, पौंड रोड, वनाज पुणे - ४११०३८

Photo.png
विवेक दे.ठाकरे 
(समूह संपादक)
ग्रामगौरव पब्लिकेशन
vivekthakare555@gmail.com
Photo.png
कु. धनश्री वि. ठाकरे
(एडिटर इन चिफ)
ग्रामगौरव पब्लिकेशन
dhanshrithakare031@gmail.com

CONTACT -

Tel.No. 020 35000760 / 020  35001382
Cell : +91 7758812022 / +91 76200 93937
Website : www.shreesaimultiservices.com
Website : www.gramgaurav.info​

  • Facebook
  • Twitter
  • YouTube
  • Whatsapp
bottom of page