top of page

सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, कृषी, सहकार, अध्यात्म, कायदा अशा विविध क्षेत्रांत अफट काम केलेल्या महान व्यक्तिमत्त्वांच्या कर्तृत्वाची ओळख नव्या पिढीला करून देण्याच्या उद्देशाने ‘ग्रामविकसाचे योगीराज’ हे सदर सुरू करीत आहोत. केवळ महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणावर अमीट ठसा उमटविणारे ज्येष्ठ नेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकतेच ८१व्या वर्षात पदार्पण केले. राज्याच्या सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, कृषी, सहकर अशा क्षेत्रांच्या विकासात अतुलनीय योगदान देणाऱ्या शरद पवार यांच्याविषयी त्यांच्या सहकाऱ्यांनी व्यक्त केलेल्या भावना...

- अरुण गुजराथी

---------------------------------------------------------------------------------------------------------------

शरद पवार साहेबांशी माझा सर्वप्रथम संबंध आला तो १९५९ मध्ये... पुण्यातल्या बृहन्महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स अर्थात बीएमसीसीमध्ये आम्ही एकत्र शिकलो. तेव्हापासून आजतागायत मी पवार साहेबांच्या संपर्कात आहे. त्यांच्या नेतृत्त्वाखाली काम करण्याची संधी मिळाली, याबद्दल मी स्वत:ला भाग्यवान समजतो. पवार साहेबांचे महाविद्यालयीन जीवन आठवताना मला अजूनही एक गोष्टीचं अप्रुप वाटते. बीएमसीसी हे तसे लहान कॉलेज. तेथील विद्यार्थी प्रतिनिधी तर पवार साहेब ठरवत होतेच... यासोबतच फर्ग्युसन कॉलेज, एसपी कॉलेज, वाडिया कॉलेज यांसारख्या मोठ्या कॉलेजचे ‘जीएस’ देखील तेच ठरवत असत! शेकडो विद्यार्थी त्यांचे चाहते होते. पवार साहेबांच्या पुढील वाटचालीत त्यांच्या चाहत्यांमध्ये सातत्याने वाढ होत गेली... जी आजतागायत सुरूच आहे. त्यांच्या असंख्य चाहत्यांपैकी एक असल्याचा मला कायम अभिमान वाटतो. महाविद्यालयीन जीवनात शिस्तीचे कठोर पालन करीत असल्याने प्राध्यापकांमध्येही ते प्रिय होते. प्राचार्य मावळणकर, उपप्राचार्य शेजवलकर, वैद्य सर यांच्याबद्दल साहेबांच्या मनात विशेष असा कृतज्ञतेचा भाव होता.


विचार-विवेक-विनय आणि विनोद यांचा अपूर्व संगम म्हणजे साहेबांचं व्यक्तिमत्त्व ! १९६२ मध्ये त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. युवक संघटना बळकट करण्यास तेव्हा त्यांनी प्राथमिक्ता दिली. मुंबई शहरातील गर्दीने खच्चून भरलेल्या लोकलमध्ये प्रवास करीत ते लोकभावना जाणून घेत असत. आमदार म्हणून सर्वप्रथम निवडून आल्यावर साहेब आणखी माजी अध्यक्ष, महाराष्ट्र विधानसभा माजी प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस झपाट्याने कामाला लागले. विद्यार्थी जीवनाप्रमाणेच त्यांच्या राजकीय जीवनाचाही इतरांवर प्रचंड सकारात्मक प्रभाव पडला. राज्यमंत्री म्हणून त्यांनी तडफदारपणे काम केले. योग्य नियोजन, संघटनशक्ती, कठोर परिश्रम आणि निर्णयक्षमता यांचा परिपाक म्हणजे साहेब !


१९९९ मध्ये साहेबांनी लोक्सभा लढविली तेव्हा भाजपातर्फे प्रतिभाताई लोखंडे त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार होत्या. निवडणुकीनंतर एक दिवस प्रतिभाताई संसदेच्या प्रांगणात उभ्या होत्या. साहेब त्यांच्याकडे गेले आणि त्यांची आस्थेने विचारपूस केली. चांगली लढत दिली, असं म्हणून त्यांच्याशी संवाद साधला आणि संध्याकाळी बंगल्यावर चहापानाचे निमंत्रण दिले. खुद्द प्रतिभाताईंनी एक मुलाखतीत हा सर्व उलगडा केला. लोक्शाहीची आदर्श तत्त्वे अंगी

बाणवताना शत्रूत्त्व, द्वेशभावना नसावी, याची काळजी साहेबांनी कायम घेतली. पूज्य विनोबाजी म्हणत...

‘‘ निवडणुका या लढायच्या नसतात, खेळायच्या असतात.’’ राजकीय जीवनात हा नियम पवार साहेबांनी नेहमीच पाळला.


साहेब स्थितप्रज्ञ आहेत. आपल्या राजकीय जीवनात त्यांनी अनेक चढ-उतार अनुभवले. अनेक जवळचे कार्यकर्ते, नेते त्यांना सोडून इतर पक्षांमध्ये गेले, अनेक संकटे आली. पण प्रचंड आत्मविश्वास, निर्णयक्षमता, कार्यक्षमता या गुणांच्या कुटुंबवत्सल साहेब मी मंत्री असताना माझी कन्या सारंगी हिच्या लग्नाचा स्वागत समारंभ आम्ही मुंबईत आयोजित केला होता. आमचे सर्व कुटुंब चोपड्याहून मुंबईत आले होते. त्यावेळी साहेबांनी माझ्या कुटुंबीयांना वर्षा बंगल्यावर चहापानासाठी निमंत्रित केले. माझे वडील छोटे मगनभाई हे स्वातंत्र्यसैनिक होते. वर्षा बंगल्याच्या हिरवळीवरून आम्ही परत निघालो तेव्हा साहेबांनी स्वत: कारचा दरबाजा उघडून वडिलांना गाडीत बसविले आणि दार बंद केले. इतक्या उंचीवर पोहोचूनही वडिलधाऱ्यांना आदर देण्याची वृत्ती पाहून आम्ही सर्व कुटंबीय भारावलो. २००४ मध्ये निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर मी दिवाळी साजरी करण्याच्या मन:स्थितीत नव्हतो. हे पाहून साहेबांनी मला दिवाळीसाठी बारामतीला सोबत नेले होते. असे अनेक प्रसंग मी मनाच्या कुपीत जतन करून ठेवले आहेत. त्या आठवणींचा सुगंधी दरवळ आयुष्यभर मला शब्दातीत आनंद देणारा आहे.

आम्हा सहकाऱ्यांनाच नाही तर कार्यकर्त्यांनादेखील साहेबांनी कुटुंबाचा भाग मानलं आणि कुटुंबप्रमुख म्हणून सर्वांची काळजीही घेतली. मी राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष होतो, तेव्हाची गोष्ट... विदर्भाच्या दौऱ्यावर असताना एक जिल्हाध्यक्ष अनुपस्थित होते. कार्यकर्त्यांकडून कळले की आजारी असल्याने मुंबईत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. हॉस्पिटलचे बिल १५ लाख रुपये झाले असून ते भरणे जिल्हाध्यक्षांना शक्य नाही. यासंदर्भात मी तातडीने हेमंत टकले यांना फोन केला. यावर टकले यांनी जी माहिती दिली, ते ऐकून मी थक्क झालो. टकले यांनी सांगितले की, ‘‘ दोन दिवसांपूर्वी हा विषय कळल्यावर साहेबांनी स्वत: संपूर्ण बिल भरले आणि त्यांची उर्वरित व्यवस्था केली’’, हे ऐकून माझे मन आणि डोळे, दोन्ही भरून आले. असा असतो नेता ! कार्यकर्त्यांना परिवारातलाच एक सदस्य मानणारे साहेब त्यांच्या सुखदुःखात सहभागी होतात. हे उदाहरण आम्हा कार्यकर्त्यांना बरेच काही शिकवून गेले.


जोरावर साहेब सर्वांना पुरुन उरले. महिला धोरण, अर्थसंकल्पात अनुसुचित जाती-जमातीसाठी लोक्संख्यानिहाय तरतूद, मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर, शेतकयांसाठी कर्जमाफी- व्याजदर कमी करणे -जास्त कर्ज उपलब्ध करून देणे, फळबागांसंबंधी धोरण असे अनेक महत्त्वपूर्ण आणि क्रांतिकारी निर्णय साहेबांनी आपल्या नेतृत्त्वाखाली घेतले. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारांनुसार आणि यशवंतराव चव्हाण यांनी दाखविलेल्या मार्गावर चालणारा नेता म्हणून जनतेने त्यांना प्रेमाने जाणता राजा ही उपाधी बहाल केली. विकासाबरोबरच सामाजिक न्यायावर साहेबांनी नेहमीच भर दिला. विकासाचा फायदा शेवटच्या माणसापर्यंत पोहोचला पाहिजे, याची त्यांनी नेहमीच काळजी घेतली. साहेब म्हणजे साधी राहणी-उच्च विचार, प्रशासनावर पक्ड, संघटन चातुर्य, दूरदृष्टी पूर्ण दीर्घकालीन नियोजन, मनाचा मोठेपणा अशा अनेक बाबींचा संगम असलेले चतुरस्र व्यक्तिमत्त्व आहे.


बोली तो अनमोल है, ये समझ के बोल

मुंह में तराजू तोलकर बाद में मुंह खोल....


हे साहेबांकडून शिकले पाहिजे. ते प्रत्येक शब्द मोजूनमापून बोलतात. दोन वर्षांपूर्वी आपल्या महाराष्ट्रात झालेल्या

विधानसभा निवडणुकीत भाजपाचे सर्वाधिक आमदार निवडून आले. पण सरकार बनले ते शिवसेना-राष्ट्रवादी आणि कँग्रेसचे ! हे समीकरण अनेक अर्थानी ऐतिहासिक आहे. असा चमत्कार फक्त साहेबच करु शकतात.


मुश्किलों की दौर में हर कोई बहानों की चादर ओढ लेता हैं

पर हारी बाजी को जो पलट देता हैं वो ही असली शेर कहलाता हैं... वो ही शरद पवार कहलाता हैं !


हे सरकार स्थापन करताना साहेबांच्या राजकीय चाणाक्षपणाचे दर्शन झाले. शरद पवार म्हणजे सहवासातील सर्वांना अखंड चेतना, प्रेरणा अन् सहवास देणारा परीस! हर जिंदगी जिंदगी मांगे आप से हर खुशबू खुशबू मांगे आप से इतनी रौशनी हैं आप के पास किउगता हुआ सूरज भी रौशनी मांगे आप से कितीही उपमा अलंकार वापरले तरी शरद पवार यांचे व्यक्तिमत्त्व शब्दांत उलगडणे शक्य नाही. साहेबांविषयी प्रत्यक्ष पाहिलेल्या-अनुभवलेल्या काही घटनांचा उल्लेख मी केला, पण त्यांचे र्तृत्त्व शब्दातीत आहे. अशा महान नेत्यास पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.

bottom of page